नाताळनिमित्त तीन विशेष रेल्वे गाड्या

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 08, 2025 11:10 AM
views 216  views

कणकवली : हिवाळा आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर तीन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांना सिंधुदुर्गातील काही स्थानकांवर थांबे आहेत.

सीएसएमटी - करमळी (०११५१/०११५२) ही गाडी १९ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२६ या काळात दररोज धावणार आहे. ०११५१ सीएसएमटीहून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि करमाळीला त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. ०११५२ करमळीहून दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिविम या स्थानकांवर थांबणार आहे. 

लोकमान्य टिळक (टी) थिरुवनंतपुरम उत्तर विशेष (०११७१/०११७२) ही साप्ताहिक गाडी १८ डिसेंबर २०२५ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान धावणार आहे. ०११७१ लोकमान्य टिळक (टी) येथून दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम उत्तर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वा पोहचेल. ०११७२ दर शनिवारी थिरुवनंतपुरम उत्तर येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल. ही ट्रेन मध्यरात्री १ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. या गाडीचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंडुराबी रोड, सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शौरानूर जं., त्रिसूर, अलुवा, अलु एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, चौगनासेरी, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम, करुणागपल्ली, सस्थानकोडा कोल्लम आणि वर्कला शिवगिरी स्टेशन्सवर असतील.

लोकमान्य टिळक (टी)- मंगळुरू जंक्शन विशेष (०११८५/०११८६) ही साप्ताहिक गाडी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ दरम्यान दर धावेल. ०११८५ ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून मंगळवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.५ वा. मंगळुरू जं. येथे पोहचेल. ०११८६ मंगळुरू जंक्शन येथून बुधवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.५० वा. लोकमान्य टिळक (टी) येथे पोहचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकल, मुकांबीका रोड, कुंडापूर, उडुपी आणि सुरथकाल येथे थांबणार आहे.