
कणकवली : मालवणच्या स्टिंग ऑपरेशननंतर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे कणकवलीत दाखल झाले आहेत. कणकवली शहर विकास आघाडीच्या विजयाची काय रणनीती आखणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. राजन तेली यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असून उपनेते संजय आग्रे, उद्धव ठाकरे सेनेचे सतीश सावंत, यांच्यासमवेत महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत.
शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी मतदारांना अमिश दाखवले जात आहेत. दहा - पंधरा हजार रुपये मतदारांना वाटत असल्याचा आरोप केला होता. यानंतर प्रथमच आमदार निलेश राणे हे कणकवली दाखल झाले आहेत नेमकं या संदर्भात ते काय भूमिका मांडतात हे देखील पहावं लागणार आहे.










