
कणकवली : मालवण नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैशाची बॅग असल्याचे दाखवून देत ती पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्यानंतर आता कणकवलीत देखील अशाच पद्धतीचे पैशाचं वाटप होत असल्याचे शहर विकास आघाडीचे नेते संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथक कणकवलीत गस्त घालत आहेत. काही ठिकाणी या पथकाने रात्रीच्या वेळी येणाऱ्या दोन चाकी आणि चारचाकी वाहनांची तपासणी केली. कणकवलीत देखील रात्रीच्या वेळी मोठ्या पैशाचा घबाड मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्तात वाढ देखील केली असल्याचे पाहायला मिळतय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून गाड्यांची तपासणी केली. यावेळी भरारी पथक प्रमुख आर. एल. शिंदे, सहाय्यक ए. बी. चव्हाण, पोलीस शिपाई एस. बी. पाटील उपस्थित होते.










