कणकवलीचं नगराध्यक्षपद 'मागास प्रवर्ग सर्वसाधारण'साठी राखीव

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 06, 2025 14:19 PM
views 271  views

कणकवली : राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतींचे आरक्षण सोमवारी मुंबईत मंत्रालय येथे सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. यात कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण या राखीव जागे करता आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. कणकवली नगरपंचायतीवर यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे हे कार्यरत असताना सर्वसाधारण आरक्षण होते. थेट नगराध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गेली तीन वर्ष नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. आता नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे. दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी नगरसेवकांच्या आरक्षण सोडती जाहीर होणार असल्याने लवकरच नगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.