म्हशीचं दूध काढण्यावरुन वाद

प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 16, 2025 11:43 AM
views 273  views

कणकवली : म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी कुंभवडे गावठणवाडी येथील सुरेश भिकाजी सावंत (५३) व स्मिता सुरेश सावंत (४९) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिल दिनकर सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुंभवडे गावठणवाडी येथे घडली. 

अनिल सावंत व सुरेश सावंत यांच्यात म्हशीचे दूध काढण्यावरून वाद सुरू आहेत. त्यादरम्यान अनिल सावंत हे सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास म्हशीचे दूध काढून डेअरीमध्ये देण्यासाठी जात होते. त्यादरम्यान सुरेश सावंत व स्मिता सावंत यांनी त्यांना अडवून 'तू दूध का काढले ? अशी विचारणा करत शिवीगाळ करत मारहाण केली व जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यानंतर अनिल सावंत यांच्या हातात असलेले दूध सांडवून सुमारे १२० रुपयांचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.