
कणकवली : जन्मदात्या आईचा कोयत्याने हल्ला करुन खून करणारा माथेफिरु रवींद्र रामचंद्र सोरप (45, रा. वारगाव) याला शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
खूनाची घटना बुधवारी रात्री 11.30 वा. च्या सुमारास घडली होती. रवींद्र याने त्याची 80 वर्षे वृध्द आई प्रभावती हिचा दारुच्या नशेत तिच्यावर कोयत्याने सपासप वार करुन खून केला होता. घटनास्थळावरुन त्याला ताब्यात घेत त्याला पोलिसांनी अटक केली होती. तपासी अधिकारी पोलिस निरिक्षक तेजस नलवडे यांनी रवींद्र याला शुक्रवारी कणकवली न्यायालयात हजर केले. आरोपी याने दारुच्या नशेत खून केला असला तरी त्यामागे अन्य काही कारण आहे का? याबाबत व अन्य काही मुद्यांबाबत तपास करावयाचा असल्याने त्याच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. त्यावर न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी आरोपीला सुनावली.










