LIVE UPDATES

नितेश राणेंच्या वाढदिनी वरवडेत बाल आरोग्य शिबिर

Edited by: समीर सावंत
Published on: June 20, 2025 12:22 PM
views 107  views

कणकवली : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जुनला सकाळी १० वाजता वरवडे गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बाल आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. यावेळी वरवडे ग्रामपंचायत आणि ॲड. अभिजीत सावंत यांच्या सौजन्याने सर्व शालेय विद्यार्थ्याना शालोपयोगी वस्तु, केक व खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.