
कणकवली : कणकवली, वैभववाडी, देवगड या तिन्ही तालुक्यासाठी गर्भवती महिला किंवा महिलांचे इतर आजार उद्भवल्यास पहिलं आठवतं ते कणकवली उपजिल्हा रुग्णालय कारण याच रुग्णालयातून वर्षानुवर्षी गरोदर महिलांना चांगली सेवा देण्यात आली होती. पण जून 2025 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत गेली सहा महिने या रुग्णालयात महिला तज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्यामुळे गरोदर महिलांची हेळसांड होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हा शल्यचिकीचक याकडे लक्ष देणार काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
कारण वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात महिला स्त्रीरोग तज्ञ मिळावे यासाठी मागणी केली. पाठपुरावा देखील केला. पण नवीन डॉक्टर भरती आल्यानंतर उपलब्ध असे सांगण्यात येत आहे. पण सध्या निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे हे सर्व लांबणीवर गेले आणि कोणच महिला तज्ञ डॉक्टर सध्या उपलब्ध नाही त्यामुळेच आता याचा फटका हा सर्व सामान्य नागरिक आणि महिलांना बसत आहे.
तसेच, या रुग्णालयात दर गुरुवारी गरोदर महिलांची सोनोग्राफी करून त्यांची तपासणी करण्यात येते व योग्य मार्गदर्शन देखील होते. पण इमर्जन्सी प्रसूती करायची झाली तर डॉक्टरच उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णांची गरोदर मातांची मोठी गैरसोय निर्माण होते. काही गरोदर महिलांची प्रसूती ही उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुढे पाठवण्यात आली आणि ॲम्बुलन्स मध्ये झाली हे सगळं घडल्यानंतर देखील आपल्याकडे रुग्णालयात महिला तज्ञ डॉक्टर उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा शिल्लक चिकित्सक यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.










