
कणकवली : कणकवली तालुका प्रवास संघ प्रवाशांच्या हितासाठी काम करीत आहे. प्रवाशांच्या प्रश्न व समस्यांबाबत आवाज उठविण्याचे काम प्रवासी संघ करीत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणासह सिंधुदुर्ग जिल्ह््यात दाखल होणाºया चाकरमान्यांचे दरवर्षी प्रवासी संघ स्वागत करीत आहे. संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. या यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नागेश चिकणे यांनी केले. दरम्यान, लवकर निघा...सावकाश प्रवास करा...सुरक्षित घरी जा...सण आनंदाने साजरा करा... असा संदेश प्रवास संघातर्फे देण्यात आला.
गणेशोत्सवानिमित्त रेल्वेतून सिंधुदुर्गात आलेल्या चाकरमान्यांचे कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे पुष्प, चॉकलेट, प्रवाशांना सुचना करणारी पत्रके वाटप करण्याचा उपक्रम कणकवली रेल्वे स्थानकात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. चिकणे बोलत होते. यावेळी माजी सभापती सुरेश सावंत, कणकवली तालुका प्रवासी संघाचे मनोहर पालयेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके, प्रवासी संघाचे उपाध्यक्ष रमेश जोगळे, सचिव विलास चव्हाण, प्रा. हरिभाऊ भिसे, आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे, रिक्षा संघटनेचे बाळा सावंत, सुमित राणे, संजय मालंडकर, पोलीस विनोद चव्हाण, महिला पोलीस स्वप्नाली तांबे आदी उपस्थित होते.
भालचंद्र मराठे म्हणाले, गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह््यात चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य आहे. कणकवली तालुका प्रवासी संघ प्रवाशांच्या न्याय व हक्कांसाठी लढा देत आहे. संघाच्या या कार्यात तरुण पिढीने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
भगवान लोके म्हणाले, कणकवली तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर हे उतार वयात देखील संघाचे जोमाने काम करीत आहेत. त्यांची ही प्रेरणा तरुण पिढीने घेतली पाहिजे. संघाच्या माध्यमातून प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू आहे. संघाचा चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
सुरेश सावंत म्हणाले, कणकवली तालुका प्रवासी संघ गेली कित्येक वर्षे गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग येणाºया चाकरमान्यांचा स्वागत करीत आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित होण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे. यंदाचा उपक्रम कणकवली रेल्वे स्थानक परिसरात घेतला, याबद्दल मी संघाचे आभार मानतो. कोकण रेल्वेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी व कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा चांगली सेवा मिळावी याकरिता कोकण रेल्वे संघर्ष समितीची लवकरच स्थापना केली जाणार आहे.
प्रवासी संघाच्या चाकरमान्यांचे स्वागत या उपक्रमाचे प्रा. हरिभाऊ भिसे यांनी कौतुक केले. प्रास्ताविकेत प्रवास संघाच्या कार्याचा आढावा मनोहर पालयेकर यांनी घेतला. चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम घेण्यामागील उद्देश त्यांनी उपस्थितांना सांगितले. प्रवाशांनी आपल्या तक्रारी प्रवासी संघातर्फे दाखल कराव्यात. त्या तकारी सोडविण्यासाठी संघ पूर्तता करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन रमेश जोगळे यांनी केले. आरंभी मान्यवरांचे स्वागत मनोहर पालयेकर यांनी केले. यावेळी कृष्णा दळवी, सेवानिवृत्त पं.स.च्या अधिकारी सुगंधा देवरूखकर, अशोक भिसे, जनार्दन शेळके, रिमा भोसले, राजन भोसले, विद्या शिरसाट, सी.आर. चव्हाण, सुभाष राणे, अनिल परब, अमित मयेकर, संजय मालंडकर, ऋषिकेश कोरडे, ज्ञानेश पाताडे, महानंद चव्हाण, अशोक नेरूळकर, संदेश मयेकर, राजेश रेगे यांच्यासह स्काऊंट गाईडचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुंबईहून सिंधुदुर्गात दाखल झालेल्या प्रवाशांचे प्रवास संघाच्या पदाधिकारी व उपस्थितांनी स्वागत केले.