
कणकवली : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान आम्ही अनेक बाबी कणकवलीकरांना बघायला मिळाल्या. या निवडणुकीमध्ये 'लक्ष्मी दर्शन' काही औरच होते. अगदी पाचअंकी आकडे कणकवलीकरांना बघायला मिळाले. मात्र 'लक्ष्मी'चा जसा लाभ झाला तशीच 'लक्ष्मी' 'रिटर्न' करण्याचीही वेळ काहींवर आली आहे.
'लक्ष्मी'लाभाच्या अनेक मतदारांना मतदानानंतर वेगवेगळ्या नंबर वरून कॉल येत आहेत. सदर मतदाराने नेमके कोणाला मतदान केले, याचा अंदाज घेतला जात आहे. सदर मतदान आपल्या विरोधात गेले, याची खात्री पटताच 'लक्ष्मी' परत करा, असे मतदारांना सुनावले जात आहे. कणकवलीत ठीकठिकाणी हे प्रकार सुरू असून याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे.










