कणकवलीच्या सुवर्णकाराची वैभववाडीत आत्महत्या

जनशताब्दी एक्सप्रेसखाली स्वत:ला दिले झोकुन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 27, 2023 19:45 PM
views 1442  views

वैभववाडी : कणकवली येथील एका दुकानात सुवर्णकार म्हणून काम करणाऱ्या शैलेश मधुकर कुडाळकर (वय-४५) या सुवर्णकाराने वैभववाडीत रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. हा प्रकार आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वेस्थानकानजीक झाला.

शैलेश कुडाळकर हे आज दिवा पॅसेंजरने वैभववाडी स्थानकात आले. त्यानंतर स्थानकापासुन काही ४०० मीटर अतंरावर जाऊन त्यानी कणकवलीकडुन राजापुरकडे जाणाऱ्या जनशताब्दी गाडीखाली स्वताला झोकुन दिले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहीती पोलीसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई,पोलीस कर्मचारी शिंदे हे घटनास्थळी पोहोचले. मयताकडे कणकवली ते वैभववाडी अशी दिवा पॅसेंजरची तिकीट होती. मयताची ओळख पटविण्यासाठी शैलेशचा भाऊ संतोष कुडाळकर याला पोलीसांनी घटनास्थळी बोलविले होते. त्याने मृतदेह शैलेशचा असल्याचे सांगीतले. शैलेश हा कणकवली परबवाडी येथील हरिप्रिया अपार्टमेंटमध्ये राहत होता. सुर्वणकार म्हणुन तो काम करीत असे. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजु शकलेले नाही. त्याच्या पश्यात पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊअसा परिवार आहे.