स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा कणकवली - देवगड इथं मोफत शो

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 01, 2024 05:59 AM
views 323  views

कणकवली : राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड, सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट प्रेक्षकांना मोफत दाखविण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक २ एप्रिल व बुधवार दिनांक ३ एप्रिल रोजी दुपारी ठीक १२ वाजता लक्ष्मी चित्रमंदिर कणकवली आणि स्टार लाईट चित्रपटगृह देवगड येथे मोफत शो प्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. याचा लाभ घेत प्रेक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमा पहावा असे आवाहन राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगडच्या वतीने करण्यात आले आहे.