हरकुळ खुर्द इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी सतीश सावंत यांच्या हस्ते दाखले वाटप

खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपक्रम
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 25, 2026 12:27 PM
views 36  views

कणकवली :  राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसाचे तथा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ खुर्द येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम राबविण्यात आला. निराधार तसेच ज्येष्ठ नागरिक आणि परित्यक्ता यांच्यासाठी मोफत उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते झाले. हरकुळ खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी हरकुळ खुर्दचे सरपंच राजन रासम,  उपसरपंच सर्वेश दळवी , भाजप शक्ती केंद्राचे प्रमुख राजा डीचवलकर , माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र डिचवलकर , माजी उपसरपंच संजय रावले आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय योजना आणि गावातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याची माहिती सतीश सावंत यांनी उपस्थितांना दिली. या शिबिरामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक यांना महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. जवळपास ५० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले.