तरुणाचा आकस्मिक मृत्यू

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 20, 2026 19:10 PM
views 204  views

कणकवली :  अस्वस्थ वाटू लागल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अमित श्रीधर पवार (४०, तळेरे वाघाचीवाडी)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित यांना सोमवारी सकाळच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याबाबत अमित यांचे भाऊ अरविंद श्रीधर पवार यांच्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.