
कणकवली : माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधीलकी जपत साजरा करण्यात आला. कणकवली शहरात डबलबारी भजन सामना, आरोग्य शिबिर यासह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी मातोश्री. शिक्षण प्रसारक मंडळामार्फत मोफत औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पंकज पाटील, प्रिती कोरगावकर तसेच मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे संतोष सावंत, चंद्रशेखर उपरकर, प्रणव उपरकर, गणेश पारकर, पप्पू कोरगावकर, विलास गुडेकर, निलेश चव्हाण, राजू कोरगावकर, भाऊ आरोलकर, शैलेंद्र नेरकर, समीर परब, वगैरे कार्यकर्ते उपस्थित होते.










