
कणकवली : नारायण राणेंसारखा प्रभावी विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातच नव्हे तर देशात होणे नाही. अशा नेत्याच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्राला नव्हे तर देशाला गरज आहे असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी खासदार राणे बोलत बोटे. ते म्हणाले, नारायण राणे यांचे जीवन अतिशय जवळून अनुभवता आले. त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आले. संघर्षावर कशी मात केली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. मुंबई महापालिकेत त्यांनी अनेक पदे भूषविली. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोनं केलं. आमदार, मंत्री, विरोधीपक्ष नेता, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, अशी सर्व पदे त्यांनी भूषविली. अतिशय जवळचा मित्र म्हणून नारायण राणे आहेत. माझ्या अडचणीवेळी नारायण राणे नेहमीच खंबीरपणे पाठीशी राहिले. अनेक प्रकल्प मार्गी लावता आले. त्यांच्या राजकीय जीवनात स्पष्ट विचार, परखड मत, जे बोलायचं आहे ते बेधडक बोलायचे ही त्यांची ख्यासीयत. प्रशासकीय कौशल्य वाखान्यांजोगे आहे. सर्वात प्रभावी कामगिरी करणारे मंत्री म्हणून नारायण राणे होते. विधांनमंडळात अनेक नेते होऊन गेले. परंतु प्रभावी विरोधी पक्षनेते होतील हे कोणाला वाटले नव्हते. त्यांची विरोधी पक्षनेते असतानाची भाषणे तरुण आमदारांनी वाचणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर मत व्यक्त केले तर त्यावर ते ठाम राहत असत. भाषणे एवढी अभ्यासपूर्ण करू शकतात यावर कोणाचा विश्वास नव्हता. त्यावेळी मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो. आम्ही दोघेही कोणते मुद्दे उचलायचे आहेत यावर तयारी करायचो. आदर्श विरोधी पक्षनेता म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर देशात असा प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून नारायण राणे आहेत. असा नेता आम्हाला गमवायचा नव्हता. असा नेता आम्हाला गमवायचा नव्हता. मात्र ते कसे दूर गेले ते सुनील तटकरे यांनी सांगितले. कठीण परिस्थितीत सर्व संकटावर मात करून यश मिळविले याचा अभिमान आहे. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्राला नव्हे तर देशाला गरज आहे.









