
कणकवली : शहरातील गणपती सानानजीक असलेल्या चौंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त मंगळवार ३० रोजी देवीचा गोंधळ होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवलीच्यावतीने मंदिरात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. मंगळवार ३० रोजी देवीचा गोंधळ होणार आहे. संध्या. ६.३० वा. जोगवा व त्यानंतर गोंधळ होईल. रात्री ९ वा. नित्य आरती होईल. सर्वांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टीसमाज सेवा संघातर्फे करण्यात आले आहे.










