
कणकवली : कोल्हापूर येथे झालेल्या वैदिक गणित स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यातून एकूण १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली वैदिक गणित सेंटर कणकवलीचे १९ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यात वेदांत गुरव हा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. कृष्णा बंडागळे व परिणीती ठाकूर द्वितीय क्रमांकचे तर वेदांत करुले तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. पार्थ तेली याने चौथा , ऋता जोशी हिने पाचवा, तेजस सावंत याने सहावा क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. सारा गोखले, अनन्या पडते, कार्तिक साईल, वेदा महाडिक, यशस्वी तेली,प्रांजल तवटे, सेजल पिळणकर, शौर्य तेली, पुष्कर महाडिक, पद्मज महाडिक, अद्विक गायकवाड, भूमी बंडागळे यांनी वैदिक गणित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत यश संपादन केले. त्यांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या विद्यार्थ्यांना वैदिक गणित सेंटर कणकवलीच्या संचालिका डॉ. स्नेहल जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.