
कणकवली : कणकवली पर्यटन महोत्सवास भव्य शोभायात्रेने आज सायंकाळी प्रारंभ झाला. कणकवली शहरातील 17 प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकणच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून घडविण्यात आले. बैलगाड्यांसह दशावतारी कला संस्कृती सुद्धा या शोभायात्रेतून दाखविण्यात आली. याच सोबत कोकणात मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या बुरुड कामाचा देखील चित्ररथ देखावा या शोभायात्रेत लक्षवेधी ठरत होता. कणकवली पटकीदेवी समोरून कणकवली महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या शुभारंभ पूर्वी शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर ढोल पथकाच्या निनादात पटकीदेवी कडून बाजारपेठ मार्गे सुरू झालेली ही शोभायात्रा पर्यटन महोत्सव स्थळाच्या दिशेने मार्गस्थ झाली. कणकवली बाजारपेठ मधून शोभायात्रा महामार्ग वरून पर्यटन महोत्सव स्थळाच्या दिशेने रवाना झाली. या शोभायात्रेत नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बांधकाम सभापती विराज भोसले सर्व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते