कणकवली तालुका पत्रकार संघाच्या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 17, 2023 16:22 PM
views 155  views

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे.

यात पाचवी ते सातवी या गटासाठी कोरोनातील दिवस व दप्तराचे ओझे हे दोन विषय देण्यात आले होते. यात अनुक्रमे १ कु. इश्वरी गोविंद लाड (एस. एम. हायस्कूल, कणकवली), २. सृष्टी सखाराम तेली (शिवडाव हायस्कूल), ३. श्रेया प्रदीप कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली) उत्तेजनार्थ प्रांजली राजेंद्र कोलते (जि.प. शाळा नविन कुर्ली वसाहत, फोंडाघाट) व जुई पद्माकर देसाई (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे) यांनी यश मिळविले.

आठवी ते दहावीच्या गटासाठी मी पत्रकार झालो तर आणि सोशल मिडीया- शाप की वरदान हे विषय देण्यात आले होते. यात अनुक्रमे १. तनया प्रविण कदम (एस. एम. हायस्कूल, कणकवली) २. ओंकार संजय सदडेकर (शिवडाव हायस्कूल), ३. मयुरेश शाम सोनुर्लेकर ( आयडीयल इंग्लिश स्कूल वरवडे), तर उत्तेजनार्थ साक्षी दयानंद गांवकर (नाटळ हायस्कूल) व मधुरा उज्वल माने ( विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली) यांनी यश मिळविले आहे.

तसेच महाविद्यालयीन गटासाठी भारताचा अमृत महोत्सव व लोकशाही आणि माध्यमांची जबाबदारी हा विषय होता. यात १. सलोनी अशोक कदम (कणकवली कॉलेज) २. अलफिया शकील मालीम (कणकवली कॉलेज), ३. प्रज्ञा सत्यवान मेस्त्री (एमएम सावंत ज्यु. कॉलेज कनेडी), तर उत्तेजनार्थ प्रतिक्षा प्रभाकर देसाई (कणकवली कॉलेज) व साधना संजय लाड (कणकवली कॉलेज) यांनी पक्ष मिळविले.

या तीनही गटांसाठी विजेत्यांना तालुका पत्रकार समितीच्यावतीने 21 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पारितोषीक वितरण सोहळ्यात रोख रक्कम स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. मनिषा पाटील, निकीता बगळे व चित्राक्षी देसाई यांनी काम पाहिले.