कणकवली शिवसेना उपतालुकाप्रमुखांचं 6 वर्षासाठी निलंबन

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 31, 2024 08:06 AM
views 348  views

कणकवली : कणकवली शिवसेना उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत याचे ६ वर्षासाठी पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.

पक्षविरोधी कृती तसेच पक्ष व पक्षाच्या नेतृत्वास सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी पक्ष हितास बाधा येईल असे वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तरी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडे आपल्या कृत्याची खातरजमा करून आपणांस उपतालुकाप्रमुख पदावरून निलंबित करण्यात येत आहे. तसेच वरिष्ठांच्या कानावर या सर्व गोष्ठी घातल्या, त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार आपले पक्षातून सहा वर्षे साठी बडतर्फ करण्यात येत आहे.