सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस ठाणे हे खूप महत्त्वाचे पोलीस स्थानक आहे. या तालुक्यात बहुतेक घडणाऱ्या गुन्हयचा उलगडा पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक समशेर तडवी व उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचा सत्कार करण्यात आला.
वर्षभर कणकवली मध्ये गोवा बनावटीची दारू वाहतूक, अमली पदार्थांचा वापर व वाहतूक व त्या संदर्भातील गुन्हे, मोबाईल चोरी, अनेक गुन्हाण्यात पोलिसांना हव्या असलेल्या आरोपींचा शोध व पळून गेलेले गुन्हेगार, सीसीटीव्ही फुटेज च्या आधार घेत गुन्हेगार शोधण्यात पोलिसांनी केलेले काम, न्यायालयीन कामकाजात पोलिसांनी केलेले उत्कृष्ट तपास काम अशा सर्व बाबींचा विचार करून शुक्रवारी कणकवली पोलीस निरीक्षक तडवी यांच्यासमवेत उपनिरीक्षक अनिल हाडळ यांना चांगले काम केल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आतापर्यंत हाडळ यांना वेगवेगळ्या महत्त्वांच्या गुण्याचा उलगडा केल्याप्रकरणी यांना 15 प्रमाणपत्र मिळाले आहेत.त्यामुळे हाडळ यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.