कणकवली पोलिस निरीक्षकपदी मारुती जगताप

आज स्वीकारला पदभार
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 27, 2024 08:33 AM
views 227  views

कणकवली : कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असून आज शनिवारी त्यांनी आपल्या पदाचा कार्यभारला आहे.  याअगोदर त्यांनी रत्नागिरी ग्रामीण मध्ये पोलीस निरीक्षक पद सांभाळलं होतं. रत्नागिरी ग्रामीण भागातील बऱ्याच गुन्ह्यांचा उलगडा त्यांनी केला होता. तसेच अवैध धंद्यांवर देखील कारवाई केली होती. कणकवली पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तात्पुरता कार्यभार देण्यात आला होता.

नवीन पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक मारुती जगताप कणकवली तालुक्यात होणाऱ्या होणारे गुन्हे रोखून झालेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करावा आणि अवैध धंद्यांचा देखील छडा त्यांनी लावावा अशीच अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.