कणकवली पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर

संतोष वायंगणकर, महेश सावंत, विनय सावंत, रमेश जामसंडेकर, संजय आग्रे, दीपिका रांबाडे यांचा समावेश
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 29, 2022 19:20 PM
views 173  views

कणकवली : कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकार, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार गुरुवारी जाहीर करण्यात आले. बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार प्रहारचे निवासी संपादक संतोष वायंगणकर, शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार टीव्ही ९ चे महेश सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार दै. तरुण भारतचे कनेडी प्रतिनिधी विनय सावंत यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार खारेपाटण येथील छायाचित्रकार रमेश जामसंडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे.

यशस्वी उद्योजक पुरस्कार संजय आग्रे यांना तर सामाजिक कार्यकर्त्या पुरस्कार असलदे येथील दीविजा वृद्धाश्रमाच्या संचालिका दीपिका रांबाडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

तालुका पत्रकार समितीची बैठक तेलीआळी येथील भवानी हॉलमध्ये तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव संजय राणे, खजिनदार नितीन कदम, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष राऊळ, उपाध्यक्ष उत्तम सावंत, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर तसेच तुषार सावंत, संजय पेटकर, वीरेंद्र चिंदकर, लक्ष्मीकांत भावे, रंजिता तहसीलदार, भगवान लोके, स्वप्नील वरवडेकर, विराज गोसावी, विनोद जाधव, महेश सावंत, रमाकांत बाणे, तुळशीदास कुडतरकर, अजित सावंत आदी उपस्थित होते.

यावेळी तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांबाबत चर्चा करण्यात आली. यात सर्व पुरस्कार एकमताने निश्चित करण्यात आले. तसेच जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल तुषार सावंत यांच्या अभिनंदनाचा ठरावही घेण्यात आला. पुरस्कार वितरणाचे स्थळ व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.