
कणकवली : कणकवली शहरात आणि तालुक्यामध्ये बरीच मेडिकल दुकाने आहेत. त्यातील काही मेडिकल उत्तम सेवा बजावतात त्यामध्ये गावडे जेनेरिक मेडिकलचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. जे सध्या बस स्टॅन्ड समोर सह्याद्री हॉटेल शेजारी आहे. त्यांचीच दुसरी शाखा आता कणकवली पटवर्धन चौक येथील कोरगावकर कॉम्प्लेक्स मध्ये सुरू होत आहे. आणि तीही चक्क कणकवली मेडिकलच्या नावाने. त्यामुळे कणकवली तालुक्यातील पहिलंच कणकवली मेडिकलच्या नावाने हे जेनेरिक मेडिकल सुरू होत. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
जेनेरिक मेडिकलमध्ये नेहमी उत्तम आणि चांगल्या दर्जाचे औषधे तीही इतर किंमतीपेक्षा कमी किंमतीमध्ये उपलब्ध होतात. त्यामुळेच सध्या जिल्ह्यामध्ये जेनेरिक आधार या नावाने गावडे मेडिकल यांनी कणकवली शहरात कणकवली मेडिकल या नावाने पहिलेच जनरिक मेडिकल उपलब्ध करून जणू एक समाजकार्य सुरू केले आहे.
या मेडिकल मध्ये मिळणारी औषधेही उत्तम दर्जाची असून गुणकारी असतात आणि तीही इतर औषधांपेक्षा कमी किंमतीमध्ये असतात. त्यामुळे आता सर्वसामान्य देखील या मेडिकलला पसंती दाखवत आहेत.