कणकवली गणपती साना - जानवली पुलाचे काम युद्ध पातळीवर !

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 22, 2024 05:21 AM
views 580  views

कणकवली : कणकवली शहराला महामार्ग व ग्रामीण  भागासाठी जोडणारा सोयीचा ठरणारा कणकवली गणपती साना - जाणवली पुलाचे काम गतीने सुरु आहे. १५ जून पर्यंत हे काम पूर्ण केलं जाणार आहे. कणकवली शहरात येणाऱ्या लोकांसाठी हा फुल महत्त्वाचा ठरणार आहे. या पुलाची रुंदी ७.५ मीटर असून उंची ६ मीटर आहे. दोन्ही साईटला पादाचारांना चालण्यासाठी ट्रॅक असणार आहे. त्यामुळे या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी उपविभागीय अभियंता कमलिनी प्रभू करीत असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.

या कामाची जबाबदारी प्रभू मॅडम यांच्याकडे असल्याने त्यांनी  सायंकाळी उशिरापर्यंत थांबून काम नियोजित आराखड्यानुसार कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती  सर्वगोड यांना सांगत आपण स्वतः या कामात लक्ष घातले असून चांगल्या पद्धतीचे काम पण करू असे सांगितले. 

यावेळी कार्यकारी अभियंता यांनी असलेल्या पिलर चे काम कशा पद्धतीने सुरू आहे काँक्रिटीकरण दिलेल्या नियोजित आराखड्याप्रमाणे व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी केली व संबंधित ठेकेदारला  लवकरात लवकर दर्जेदार काम करा अशा सूचना देखील यावेळी कार्यकारी अभियंता सर्वगोड यांनी केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी विनायक जोशी हे देखील उपस्थित होते.

प्रत्यक्षात गेली आठ दिवस दिवस रात्र हे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होईल असेही ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. कणकवली देवगड वैभववाडी खारेपाटण या भागातील येणाऱ्या लोकांना हा ब्रिज पूर्ण झाल्यास रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी बायपास रस्ता देखील उपलब्ध होणार आहे. कारण कणकवली शहरांमध्ये 12 मीटर व 18 मीटर चे डीपी रस्त्याचे काम देखील प्रशासनाने हाती घेतले असल्याने ते पूर्ण झाल्यावर कणकवली रेल्वे स्टेशन कडे जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे समजते.