
कणकवली: कणकवली नगरपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू झाली असून भाजप आणि शहरविकास आघाडी अशी दोन्ही पॅनेल प्रचारात गुंतली आहेत यामध्ये सद्यस्थितीत तरी भाजपने आघाडी घेतली आहे. एकीकडे शहर विकास आघाडी स्थापन व्हायला आणि त्यांचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर व्हायला काहीच विलंब झाला होता. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे तसेच त्यांचे इतरही बरेच उमेदवार निश्चित होते व त्या अनुषंगानेच त्यांनी प्रचार यंत्रणा राबवायला सुरुवात केली होती. त्याचाच परिणाम म्हणजे प्रचारात तरी भाजपची सरशी आहे.
बुधवारी सायंकाळी कणकवली शहरातील प्रभाग सहा व सात येथे भाजपतर्फे प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी भाजपचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांनी व्यक्त केला. यावेळी प्रभाग ७ च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार सुप्रिया नलावडे, प्रभाग ६ च्या नगरसेविका पदाच्या उमेदवार स्नेहा अंधारी, स्मिता कामत, सोनाली कामत, निधी निखार्गे, संगीता कांबळी, सुप्रिया पाटील, संपदा पारकर, तन्वी मोरये, क्रांती लाड, संगीता जामसंडेकर, राज नलावडे, मनीष पेडणेकर, पंकज पेडणेकर, महेश सामंत, अमोल पारकर, महेश शिरसाट, बापू वातकर, अमिता जावडेकर, अमित धुमाळे, महेश अंधारी, भरत उबाळे, सुषमा पोटफोडे, राजा पाटकर, विनोद धुमाळे, प्रद्युम्न मुंज, स्वरूप कामत, हर्षद धुमाळे, चिन्मय माणगावकर आदी उपस्थित होते.











