
कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकुण नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये भाजपा २, महाविकास आघाडी १, बहुजन समाजवादी पार्टी १ व अपक्ष ५ अशा एकूण नऊ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.
कणकवली विधानसभेसाठी २२ऑक्टो.पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. सुरवातीच्या चार दिवसांत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली.
या 9 जणांनी दाखल केली उमदेवारी
यामध्ये महायुतीकडून आमदार नितेश राणे व अपक्ष उमेदवार गणेश माने यांनी सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल केली. तर आज मंगळवारी ठाकरे शिवसेनेचे संदेश भास्कर पारकर, अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांचे अर्ज दाखल झाले आहेत.अर्जांची छाननी झाल्यानंतर ४ तारीखला उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे