
कणकवली : मूळ बिहार व सध्या जानवली येथे वास्तव्यास असलेल्या पूनमकुमारी संतोष कुमार महतो (२४) या विवाहितीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
पुनमकुमारी ही पती संतोषकुमार साबा महतो (३८) व छोटा मुलगा यांच्यासमवेत जानवली येथे भाड्याने राहत होती. पती संतोषकुमार सेंट्रिंगचे काम करतो. शनिवारी रात्रीच्या सुमारास संतोषकुमार व पुनमकुमारी यांच्यात काही कारणास्तव भांडण झाले. याच रागातून पूनमकुमारी हिने राहत्या घराच्या खोलीत आत्महत्या केली. याबाबत संतोषकुमार यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत.










