अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद स्मरणिकेसाठी साहित्य पाठवण्याचं आवाहन

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 07, 2025 16:02 PM
views 14  views

कणकवली‌ : कणकवली  महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.या अधिवेशनात इतिहासाबरोबरच आंतरविद्याशाखीय विषयांचे अन्य शोधनिबंध स्वीकारले जाणार असून राष्ट्रीय मान्यता प्राप्त मासिकातून ते प्रसिद्ध केले जाणार आहेत.

यानिमित्ताने कोकणातील इतिहास, कला, साहित्य व संस्कृती यांना उजाळा देण्यात येणार आहे. या परिषदेत प्राध्यापक,शिक्षक व कोणत्याही अभ्यासकांना सहभागी होऊन इतिहास संस्कृती, लोककला व आंतरविद्याशाखीय शोधनिबंध सादर करता येतील. या निमित्ताने कोकणातील इतिहास, संस्कृती, कला व साहित्य यांचा ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध व्हावे या उद्देशाने 'कनक' ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. स्मरणिकेसाठी विविध महत्वपूर्ण विषयावर साहित्य मागविण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने  सावंतवाडी संस्थान, कोकणातील किल्यांचा इतिहास , कोकणातील विविध चळवळी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती चळवळ, कोकणातील नाट्य, चित्रपट संस्कृती, कोकणातील कातळ शिल्प ,कोकणाचा समग्र इतिहास, स्थानिक इतिहास , स्त्रीवादी साहित्य आणि चळवळी, महामानवांचे व समाज सुधारकांचे कार्य,

कोकणातील ग्रामनामांचा इतिहास, लोककला, दशावतार, सिंधुदुर्गातील आंबेडकरी चळवळ, सिंधुदुर्गातील स्वातंत्र्य चळवळ, प्राचीन इतिहास,सिंधुदुर्गातील नररत्ने, हुतात्मा स्मारके, प्राचीन मंदिरे अन्य धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू,ठाकर जमातीची कला, कोकणातील गावरहाटी , धार्मिक व सांस्कृतिक उत्सव, कोकणातील येथील आंबेडकरांरांची भाषणे, परिषदा,सभा,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थ शास्त्रीय विचार इत्यादी विषयाच्या अनुषंगाने  लेख  पाठवण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य युवराज महालिंगे , इतिहास परिषद स्थानिक संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक विज्ञान मंडळाचे सचिव डॉ. राजेंद्र मुंबरकर, कनक स्मरणिका संपादक प्रा.सीमा हडकर , प्रा.एस. आर. जाधव, प्रा.विजयकुमार सावंत, प्रा.मृणाल गावकर यांनी आवाहन केले आहे.