हरकुळ बुद्रुक येथील उबाठाच्या ग्रा. पं. सदस्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत प्रवेश
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 26, 2025 11:18 AM
views 79  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा. शिवसेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांनी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ओम गणेश, कणकवली येथे भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य बाळू मोरये, उल्का घाडीगावकर, सादिका हूशेनशा पटेल, उमेश गोडे, रमेश मोडक, रमेश सावंत, सुमुक तारळेकर, नितीन तारळेकर, दिलीप सामंत, भिकाजी घाडीगांवकर आणि उदय घाडीगांवकर यांचा समावेश आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू पेडणेकर, बुलंद पटेल, बालुल पटेल, अनिल कोचरे, चंद्रकांत परब आणि सर्फराज शेख आदी उपस्थित होते.