
कणकवली : कणकवलीशहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील रहिवासी व एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर शांताराम हेरेकर (८८) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी निधन झाले. एसटी चालक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी खासगी वाहन चालक म्हणूनही काम केले. त्यांच्या पाश्चात मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शहरातील भालचंद्र टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक योगेश व निलेश हेरेकर यांचे ते वडील होत.










