
कणकवली : ग्रामस्थ कला, क्रीडा मंडळ,वरवडेच्या अध्यक्षपदी संतोष पुजारे तर सचिवपदी निलेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे. उपाध्यक्षपदी निलेश सादये, खजिनदारपदी विनायक घाडीगावकर, सहसचिवपदी चेतन सावंत, प्रचारप्रसिद्धी प्रमुखपदी अनिल घाडीगावकर, विशेष सल्लगारपदी सुमंगल सावंत, सदस्यपदी मिलिंद आरोसकर, सिझर फर्नांडिस, रुपेश वायंगणकर, स्वप्नील परब, संतोष परब, मनीष वरवेडकर, विवेक राणे यांची निवड करण्यात आली आहे.