अबिद नाईकांकडून महिलांना देवदर्शन

प्रभागातील ६० महिला कुणकेश्वर, मार्लेश्वर दर्शनासाठी रवाना
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 18, 2025 18:20 PM
views 81  views

कणकवली : कणकवली शहरातील शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी या प्रभागातील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त गेली बारा वर्षे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अबिद नाईक यांच्या माध्यमातून देवदर्शनाला पाठविण्यात येते. यावर्षी या भागातील सुमारे ६० महिलांना देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वर व रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीदेव मार्लेश्वर येथे दर्शनासाठी पाठविण्यात आले.

गेल्या १२ वर्षाहून अधिक काळ शिवाजीनगर, जळकेवाडी, परबवाडी भागातील महिलाना श्रीदेव कुणकेश्वर व मार्लेश्वर येथे दर्शनासाठी पाठविण्याचा उपक्रम श्री. नाईक राबवित आहेत. या भागातील महिलावर्ग आपुलकीने देवदशर्नासाठी सहकार्याची मागणी अबिद नाईक यांच्याकडे करत असतात व श्री. नाईक न चुकता या सर्वांना सहकार्य करतात, याबाबत या महिलांनी त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. अबिद नाईक हे राजकरणाच्या पलिकडे समाजकरणाच्या माध्यमातून सातत्याने समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार असतो. याच समाजकरणाच्या भावनेते ते आम्हाला दरवर्षी देवदशर्नासाठी सहकार्य करतात. गेल्या १२ वर्षाहून अधिक काळ ते आम्हाला सहकार्य करत असल्याचे या महिलांनी सांगितले.

या देवदर्शनासाठी रवाना झालेल्या या महिलांच्या मिनीबसचा श्रीफळ वाढवून शुभारंभ श्री. नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी कंझुमर सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष निशीकांत कडुलकर, शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रभाग प्रमुख संतोष सावंत व इतर उपस्थित होते. सौ. उज्ज्वला जावडेकर, सौ. दिपाली जावडेकर, केतकी दळवी, कल्पना मलये यांच्या पुढाकाराने या प्रभागातील महिलांना एकत्रित करून हा उपक्रम राबविण्यात येतो.