
कणकवली : कणकवली - आचरा मार्गावर कणकवली पोलीस ठाण्यानजीक झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. सोमवारी दुपारी १ वा. सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कलमठचे ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग, ग्रामसेवक प्रविण कुडतरकर तसेच कलमठ ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी व अन्य साधनांच्या सहाय्याने साधरण तासाभराने झाडू बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
पोलिस स्टेशन जळव झाडाची मोठी फांदी पडून वाहतूक अडथळा झाला होता हे समजताच कलमठ ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग आणी ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी झाडाच्या फ़ांद्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली