पालकमंत्री नीतेश राणेंवर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव...!

जिल्ह्यासह राज्यभराहून कार्यकर्त्यांची उपस्थिती
Edited by: स्‍वप्‍निल वरवडेकर
Published on: June 23, 2025 16:43 PM
views 56  views

कणकवली : राज्याचे मत्स्य व बंदरविकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांचा ४३ वा वाढदिवस ओमगणेश निवासस्थानी उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यासह राज्यभरातून दाखल झालेल्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंत्री राणे यांनी वाढदिवसाचा केक कापला. राणे यांच्यावर सकाळपासून सुरु झालेला शुभेच्छांचा ओघ सायंकाळपर्यंत सुरुच होता. एकीकडे पावसाचा वर्षाव सुरु असला तरीही राणे यांच्यावरील शुभेच्छांचा वर्षाव त्याहूनही खूप मोठा होता. अर्थात राणे यांच्या वाढदिनी कार्यकर्त्यांचा उत्साह काही औरच होता.

नीतेश राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांची सोमवारी सकाळपासूनच ओमगणेश निवासस्थानी गर्दी होऊ लागली होती. सकाळी ११ वा. सुमारास राणे यांचे ओमगणेश निवासस्थानी आगमन झाले आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सिंधुगर्जना ढोलपथकाचे ढोल घुमू लागले. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. महानंदा चव्हाण व इतरांच्या तुताऱ्या जोराने घुमू लागल्या. कार्यकर्त्यांच्या गराड्यातच राणे यांनी ओमगणेश निवासस्थानात प्रवेश केला.

ओमगणेश निवासस्थानावरील लॉनवर वाढदिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राणे यांचे तेथे आगमन होताच क ार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरु केली. श्री. राणे यांचा ४३ वा वाढदिवस असल्याने तब्बल ४३ किलोचा आकर्षक केक कार्यकर्त्यांनी आणला होता. कार्यकर्त्यांच्या घोषणा, शुभेच्छांच्या वर्षावात राणे यांनी वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

कार्यकर्ते पालकमंत्र्यांना विविध भेटवस्तूही घेऊन आले होते. कित्येक कार्यकर्त्यांनी केकही आणले होते. राणे केक कापतानाच कार्यकर्त्यांनाही प्रेमाने भरवत होते. वाढदिवस कार्यक्रमाला माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प. अध्यक्षा दीप्ती पडते, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, सदाशीव ओगले, आरिफ बगदादी, भाजप कणकवली विधानसभाप्रमुख मनोज राणराणे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण, भाजप तालुक अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, जिल्हा सरचिटणीस बुवा संतोष कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कन्या इकरा व रिजा नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, प्रांताधिकारी जगदिश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, आर. जे. पवार, मुख्याधिकारी गौरी पाटील, वागदे सरपंच संदीप सावंत, कळसुली सरपंच सचिन पारधिये, वरवडे येथील सुभाषा मालंडकर, साकेडी उपसरपंचा प्रज्ज्वल वर्दम, भाजप कणकवली तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, बंडू गांगण, माजी जि. प. सदस्या सावी लोके, शासकीय ठेकेदार अनिल पवार, युवा मोर्चा पदाधिकारी संतोष उर्फ पप्पू पुजारे, भाजप तालुका उपाध्यक्ष राजेश उर्फ सोनू सावंत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.