
सावंतवाडी : 'आनंदोत्सवा'ला तुफान प्रतिसाद मिळत असून खास मनोरंजनासाठी कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आयोजित करण्यात आला आहे. ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम व आर्ट गॅलरी प्रस्तुत कळसूत्री बाहुल्यांचा खेळ ''राम सीता स्वयंवर'' च आयोजन करण्यात आले आहे. चेतन परशुराम गंगावणे, पिंगुळी कुडाळ हे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. आज 29 डिसेंबर 2024, सायंकाळी 7.00 वाजता आनंदोत्सव, आर. पी. डी हायस्कूल, सावंतवाडी येथे हा सोहळा होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन पौर्णिमा सावंत यांनी केले आहे.