इस्रोमधील शास्त्रज्ञांचे कळसुलकरच्या चिमुकल्यांनी पोस्टकार्डद्वारे केले अभिनंदन..!

Edited by: विनायक गावस
Published on: August 24, 2023 19:54 PM
views 154  views

सावंतवाडी : इस्रोमधील शास्त्रज्ञांचे कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डच्या माध्यमातून अभिनंदन केले. चांद्रयान - 3 मोहिमेतून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती पोहोचवणारा भारत देश जगातला पहिला देश ठरल्यामुळे कळसुलकर प्राथमिक शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड शुभेच्छापत्र पाठवून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

या चिमुकल्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक जिज्ञासा व आवड निर्माण व्हावी तसेच सध्याच्या मोबाईलच्या युगात पोस्टचा  पत्रव्यवहार कमी झाल्यामुळे या बालचमुना पत्रव्यवहार कसा करावा? तसेच विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रज्ञाविषयीचे प्रेम आणि देशाभिमान वाढीस लागावा, यासाठी हा उपक्रम या शाळेतील उपक्रमशील शिक्षक अमित कांबळे यांनी राबविला.

त्यांना सदर उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, संचालक यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, शिक्षक धोंडी वरक, शिक्षिका प्राची बिले, ज्योत्स्ना गुंजाळ, स्वरा राऊळ, आडेलकर, घाडीगावकर मॅडम यांचे सहकार्य लाभले.