
सावंतवाडी : कॉपीमुक्त परीक्षा आणि भ्रष्टाचार मुक्त शिक्षण संस्था हे कोकणच्या शैक्षणिक व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्याचे सर्व श्रेय संस्थाचालक व शिक्षकांना जाते. मात्र, दिशाहीन झालेले शिक्षण क्षेत्र दुर्दैवाने महाराष्ट्रात झाल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. तर राज्यात अनेक शाळेत आपण गेलो. परंतु, कळसुलकर इंग्लिश स्कूल ही शाळा चालवणाऱ्या संस्था अध्यक्षांचा मुलगा अन्य शिक्षकांची मुले याच शाळेत शिक्षकात याचे कारण संस्थाचालकांना आपली शाळा उच्च दर्जाची आहे हे पटल्यामुळे हा बदल घडून आल्याचे गौरवोद्गार ही खासदार राऊत यांनी काढले.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या वार्षिक गुणगौरव समारंभाम खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील, संस्थाध्यक्ष शैलेश पै. ठाकरे, सेनेचे महिला जिल्हाध्यक्ष जानवी सावंत, विधानसभा मतदार संघाचे विक्रांत सावंत,बाळा गावडे, चंद्रकांत कासार, आबा सावंत,श्रृतिका दळवी,रमेश गावकर, मायकल डिसोजा, दत्तप्रसाद गोठसकर, संचालक डॉक्टर प्रसाद नार्वेकर, मोहन वाडकर, गौरंग चिटणीस, रवींद्र स्वार, श्रद्धा नाईक, अण्णा म्हापसेकर, मुख्याध्यापक पी एन मानकर आदींसह विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.
यावेळी यशस्वी गुणवंत विद्यार्थी तसेच शाळेतील अष्टपैलू विद्यार्थ्यांचा खासदार विनायक राऊत तसेच तहसीलदार श्रीधर पाटील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ते म्हणाले कसूरकर इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शैलेश पै यांच्या बद्दल ऐकून होतो परंतु प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही भेट घडून आली मुळात शिक्षणाचा ध्यास व सामाजिक कार्य असलेले अध्यक्ष संस्थेला मिळाल्यास संस्थेचा भरभराट होतो आणि शैलेश पै यांच्या रूपाने संस्था अध्यक्ष लाभल्याने आज कळसुलकर शाळा पुन्हा एकदा प्रगतीपथावर आली आहे मुळात शिक्षण संस्था चालवणे आज कठीण बनले आहे दिशाहीन झालेले शिक्षण क्षेत्र दुर्दैवाने महाराष्ट्रात तयार झाले आहे शिक्षण संस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या समस्या बहुतेक शासन निर्मित असतात आज एक जीआर तर उद्या दुसरा जीआर येत असल्याने संस्थान पुढे डोकेदुखी तयार होते मात्र असे असले तरी कोकणातील शिक्षण संस्थांचा आपल्याला अभिमान वाटतो कॉपीमुक्त परीक्षा आणि भ्रष्टाचार मुक्त शिक्षण संस्था हे कोकणच्या शिक्षणाचे वैशिष्ट्य आहे परतू महाराष्ट्रात शिक्षणाचा बाजार चालू आहे शिक्षण संस्थांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे हा प्रकार माहणजे शिक्षणाला काळीमा फासणारा होय.
ते पुढे म्हणाले आज इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे अतिक्रमण जोरदार सुरू आहे परंतु मातृभाषेच्या शाळेत शिकलो म्हणून आपण कुठेतरी कमी शिकलो असे मत विद्यार्थ्यांनी करून घेऊ नये मातृभाषेतील शाळेतून शिकलेले इंग्रजीचे ज्ञान हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या ज्ञानापेक्षा अधिक भक्कम असते येणाऱ्या काळात शासकीय सेवेत येण्यासाठी स्पर्धा परीक्षेत भाग घ्या शिक्षण संस्थेने सुद्धा आपल्या शाळेतील कमीत कमी दहा विद्यार्थी अशा स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत.
तहसिलदार श्री पाटील म्हणाले. शिक्षणाबरोबरच खेळामध्येही विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे मुळात ज्या क्षेत्रामध्ये आपल्याख पाल्याचा कल आहे तो कल ओळखून त्या क्षेत्रात त्याच्या करिअरचा मार्ग निवडावा सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीला 124 वर्षाचा शैक्षणिक वर्षाचा आहे येथील शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे संस्थेला भविष्यात आवश्यक ती मदत लागल्यास आपला नेहमीच प्रयत्न राहील.