
सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडीच्या बारावी कला शाखेतील 28 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रशालेचा निकाल 96.42% लागला. प्रथम क्रमांक कोचरेकर स्नेहा विनायक -79.33. टक्के, द्वितीय आडवे बाया न्हानू -74.17. टक्के, तृतीय वडार विक्रम परशुराम- 71.83 टक्के, चतुर्थ वैद्य सिया मनोज-70.00. टक्के गुण प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई , सचिव डॉक्टर श्री. प्रसाद व सर्व पदाधिकारी, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोस्कर व सर्व पदाधिकारी,प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एन पी मानकर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, श्री प्रदीप सावंत, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग व सर्व शिक्षक वर्ग, ॲड. नम्रता नेवगी मॅडम ,व्यवस्थापिका आनंद शिशुवाटिका व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले.