कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या फर्स्ट ऑफिसर गोपाल गवस व सार्जंट कुमारी स्वरांगी खानोलकर यांचे सत्कार

Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 19:55 PM
views 102  views

सावंतवाडी : दीपकभाई केसरकर महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व मराठी राजभाषा मंत्री यांच्या मित्रमंडळाच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी  केलेल्या मान्यवरांचा जाहीर सत्कार समारंभ सावंतवाडी नगर परिषदेच्या काझीबुद्दीन शहा हॉलमध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर उपस्थित होते.

यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे सहाय्यक शिक्षक तथा एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस यांचा  कुमारी सार्जंट स्वरांगी संदीप खानोलकर हिने  गणतंत्र दिवस शिबिरामध्ये नवी दिल्ली येथे केलेल्या उज्वल कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. याचवेळी प्रशालेतील इयत्ता बारावी, दहावी व शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचेही गौरव करण्यात आले. याप्रसंगी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर हिचे कौतुक करण्यात आले. प्रशालेचे प्राचार्य एन. पी.मानकर व स्वरांगीच्या आई  स्वप्नजा खानोलकर यादेखील उपस्थित होत्या व्यासपीठावर सावंतवाडी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी आंगणे इतर मान्यवर उपस्थित होते.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कुमारी स्वरांगी खानोलकर व सहाय्यक शिक्षक एनसीसी अधिकारी व्यवस्था यांचे अभिनंदन केले.