कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

Edited by: ब्युरो
Published on: October 07, 2024 06:29 AM
views 499  views

सावंतवाडी : ज्येष्ठ अभिनेत्री, साहित्यिक कल्पना बांदेकर यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर झालाय. कलावंत विचारमंच, कमल फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने दिला जाणारा तसेच, कमल अमृत नृत्य, कमल उद्योग समूह यांच्या सौजन्याने लोककवी वामनदादा कर्डक, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, कवी वसंत बापट, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंती आणि स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणारा हा राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार आहे. 

42 पुरस्कारात सिंधुदुर्गातून कल्पना बांदेकर यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. नाशिक इथं अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते 13 ऑक्टोबरला या पुरस्काराने कल्पना बांदेकर यांना सन्मानित केलं जाईल. 

कल्पना बांदेकर गेली 30 वर्ष कला क्षेत्रात कार्यरत आहेत. नाट्य, एकांकिका, लघु चित्रपट, मालिका, बेव सिरीज, सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमात त्यांनी काम केलंय. याचबरोबर मालवणी कविता, लिखाण, बाल कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांचा मोठं योगदान आहे. त्यांच्या याच कार्यांची दखल घेत त्यांना सन्मानित केलं जाणार आहे.