
सावंतवाडी : कलंबिस्त शाळा नं. २ च्या मुलांना सह्याद्री नाईक मराठा समाजाच्यावतीने वह्या वाटप करण्यात आल्या. दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येते. यावर्षीही ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून समाजात नावलौकिक मिळवावे. अभ्यासासह खेळात गावाचे नाव उज्वल करावे. कलंबिस्त गावाला सैनिकांची परंपरा आहे. या शुर जवानांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करावी असं मार्गदर्शन अण्णा केसरकर यांनी विद्यार्थ्यांना केले. यानंतर वारीसाठी जाणाऱ्या वारकरी बांधवांना ग्रामस्थांच्या हस्ते कपड्यांच वाटप करण्यात आले. यावेळी कृष्णा नाईक, देविदास सरमळकर, प्रमोद नाईक, प्रदीप नाईक, राजेश नाईक, संजय शेडगे, श्री. मेस्त्री, सौ. सावंत, शाहु पास्ते, सचिन केसरकर आदी उपस्थित होते.