
सावंतवाडी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संयमी नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते विशाल परब यांच्या अथक प्रयत्नांतून सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त गावातील माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
कलंबिस्त गावातील सरपंच सौ. सपना सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, ग्रामपंचायत सदस्य सौ. रिया राजेश सावंत आणि सौ. मेधा तावडे यांचा भाजप परिवारात स्वागत करण्यात आले. त्यांच्यासोबतच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करून पक्षाची ताकद वाढवली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोकणातही भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. नेमक्या वेळी संवाद साधल्यास राजकीय भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या नवयुवकांना भाजपचे वाढते आकर्षण आणखी बळकट होईल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या प्रवेश सोहळ्याला भाजप जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, जिल्हा बँक संचालक रवींद्र माडगावकर, माजी जिल्हा सदस्य पंढरीभाई राऊळ, आंबोली मंडळ उपाध्यक्ष किरण सावंत, युवा मोर्चा आंबोलीचे निलेश पास्ते, स्वप्नील राऊळ, पुंडलिक कदम आणि सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर आदी उपस्थित होते.