
- पालकांमधून होत आहे कौतुक
कणकवली : कलमठ ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री नितेश राणे, तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जून २०२५ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयात आपले सेवा सरकार उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. एका वर्षात कलमठ ग्रामपंचायतीने ६२७ शैक्षणिक दाखले दिले. याबाबत कलमठ गावातील पालक समाधान आणि कौतुकही करत आहेत.
उच्च शिक्षणासाठी लागणारे उत्पन्न दाखला, अधिवास दाखला, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, ईडब्लूएस दाखला,जेष्ठ नागरिक कार्ड सर्वं मिळून ६२७ दाखले पालकांना उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायतीमध्ये सादर केल्यानंतर सर्वं दाखल्यांसाठी सरपंच संदीप मेस्त्री स्वतः तहसील कार्यालय पर्यंत पाठपुरावा करत असून प्रांतधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे यासाठी विशेष सहकार्य करत आहेत. त्यामुळे दाखले सहज आणि जलद उपलब्ध होत आहेत. दरवर्षीप्रमाणे सरपंच संदीप मेस्त्री दाखले घरपोच देण्याचा उपक्रम अखंडितपणे राबवत आहेत. यासाठी केंद्रचालक जयेश मेस्त्री यांनीही मेहनत घेतली.










