कै. वाळके मास्तर जयंतीनिमित्त स्वराज्य संघटना - विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: August 08, 2023 15:14 PM
views 282  views

सावंतवाडी : कै. वाळके मास्तर जयंती निमित्त स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून शहरात आजा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाळके मास्तर व्यायाम शाळेमध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून कै. वाळके मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करण्यात आला.

त्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्वराज्य संघटना व आजी-माजी विद्यार्थ्यांकडून व अँड. बापु गव्हाणकर यांच्या हस्ते 60 खुर्च्या भेट स्वरुपात देण्यात आल्या. या खुर्च्यांचा लाभ पेशंट व स्टाफसाठी व्हावा हा उद्देशांन देण्यात आल्या‌ आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाला शुद्ध पाण्याची सोय व्हावी म्हणून ॲक्वागार्ड मशीन माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते देण्यात आली. अशा विविध सेवाभावी उपक्रमातून कै. वाळके मास्तर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी अँड.बापू गव्हाणकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर, दिनेश गावडे, मंगेश घोगळे, अमोल साटेलकर, किशोर सोन्सुरकर, एल. ए. निचम, बाबू इन्सुलकर, अँड.राजू कासकर, राजू मसुरकर, राजू भालेकर, विशाल पोटनीस, मनोज हवालदार आदी कै. वाळके मास्तर व्यायाम शाळेचे सदस्य उपस्थित होते.