सावर्डे विद्यालयाचा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत दबदबा

Edited by: मनोज पवार
Published on: September 28, 2024 05:16 AM
views 153  views

सावर्डे : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने  चिपळूण तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच भव्य एस. व्ही.जे.सि.टी डेरवण येथे संपन्न झाल्या. या तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या 14वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने बाजी मारून तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान पटकावला आहे  व जिल्हास्तरावर चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्ण  संधी प्राप्त केली आहे. 

तालुकास्तरीय 14 वर्षे वयोगट शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये चिपळूण तालुक्यातील मुलींच्या 6 संघानी सहभाग नोंदवला. सावर्डे मुलींचा फायनल सामना युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण  या संघाबरोबर  झाला यामध्ये सहा गुणांनी विद्यालयाच्या मुलींनी विजय संपादन करून चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला.जिल्हास्तरीय सामने डेरवण येथेच होणार आहेत. आर्या घाणेकर, आर्या भुवड,नेहा डोंगरे, मुक्ता भुवड, शर्वरी हुमणे,संस्कृती मेने, सानवी पांचाळ, श्रावणी कुळे, श्रेया होडे, अंतरा निर्मळ आणि तपस्वी ओकटे या सर्व खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे व प्रशांत संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन व संचालक शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी संस्थापक अनिरुद्ध निकम,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर,पालक,शिक्षक व विद्यार्थ्यांनी या खेळाडूंचे कौतुक केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा देताना विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे  व क्रीडाशिक्षक