ज्युदो कराटेचे प्रशिक्षण काळाची गरज : अमोल टेंबकर

Edited by:
Published on: January 27, 2024 12:14 PM
views 91  views

सावंतवाडी : ज्युदो कराटेचे प्रशिक्षण काळाची गरज आहे. यातून आपले संरक्षण होतेच त्याच बरोबर संबंधित खेळाडू हा शारिरीक, मानसिक आणि नैतिक दृष्ट्या मजबूत बनतो त्यामुळे पालकांनी अशा खेळाच्या माध्यमातून आपल्या मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग डिजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर यांनी केले. दरम्यान भाजपा युवा मोच्यार्च्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक अंतर्गत स्पर्धेत या खेळाचा समावेश करुन येथील नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम आयोजकांकडून करण्यात आले आहे. ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक अंतर्गत ज्यूदो कराटे स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, भाजपा युवा मोर्च्याचे तालुका उपाध्यक्ष बंटी पुरोहित, स्पर्धेचे संयोजक निशू तोरस्कर, सेन्सॉर वसंत जाधव, प्रशिक्षण दिनेश जाधव, वसंत मोहिते, अमित तळवणेकर, स्वप्नाली कारेकर, मंगेश घोगळे, युवा पत्रकार भुवन नाईक, नितेश देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. नेवगी यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, तालुक्यातील आणि विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडुंना व्यासपीठ मिळावे यासाठी गेले ८ दिवस नमो चषकाच्या माध्यमातून विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे खर्‍या अर्थाने क्रीडा क्षेत्रातील लोकांना न्याय दिल्याचा आनंद आहे. यावेळी श्री. तोरसकर म्हणाले, या ठिकाणी वरिष्टांकडून मिळालेल्या कार्यक्रमात ज्यूदो कराटे स्पर्धेचा समावेश नव्हता. मात्र येथील खेळाडू आणि कराटे शिक्षकांनी या स्पर्धा घेण्याचा आग्रह केला. त्यामुळे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत एकुण तीनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा जुद्यो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेने जनरल चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले एकूण ७२ मेडल ची कमाई तर द्वितीय क्रमांक तळवडे येथील संस्थेने  मिळवला. बेस्ट जुडोका गर्ल म्हणून करूळ फोंडा घाटची तनवी पारकर तर बेस्ट जुडोका बॉय म्हणून संचित पाटील कासारडा या संघाला मिळाला. आमंत्रित संघ म्हणून रत्नागिरी, कोल्हापूर, आजरा या संघांना समाविष्ट केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ ते बारा असोसिएशनने या स्पर्धेत आपले विद्यार्थी सहभागी केले होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सनी जाधव, सौ. पूजा जाधव, प्रशिक्षक संदेश पंडित, योगेश बेळगावकर, प्रतीक्षा गावडे, तेजस दळवी, शिवानी म्हात्रे, मयुरेश जाधव, स्वराज गवळी या प्रशिक्षकांनी आयोजक म्हणून काम पाहिले तसेच पंच म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंच अभिजीत शेटे, अजिंक्य पोपळे, सोनू जाधव, कस्तुरी सातार्डेकर, तेजस दळवी यांनी काम पाहिले.