कुडाळातील घरफोडी प्रकरणी न्यायालयीन कोठडी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 13, 2023 19:06 PM
views 211  views

कुडाळ : कुडाळ शहरातील घरफोडी प्रकरणातील संशयित अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (रा. कुडाळ पानबाजार,क्षितिज अपार्टमेंट ) याने पांडुरंग प्लाझा संकुलातील श्रद्धा श्रीकृष्ण गवळी यांच्या बंद फ्लॅट फोडून कपाटामधील 15 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून सुमारे 1 लाख तीस हजार रुपयाचा ऐवज लंपास केला होता याप्रकरणी अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर याच्याकडे मुद्देमाल सापडून आला आहे. बुधवारी अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कुडाळ शहरातील पडतेवाडी येथील अनंत वैद्य यांचा बंद बंगला फोडून केलेल्या चोरीच्या गुन्ह्यात अक्षय याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती.त्यानंतर लगेच पोलीसांनी न्यायालयाच्या परवानगीने त्याला ताब्यात घेत अटक केली. कुडाळ - माठेवाडा येथील पांडुरंग प्लाझा संकुलातील श्रद्धा श्रीकृष्ण गवळी यांच्या बंद फ्लॅट फोडल्या प्रकरणी गुन्ह्यात ताब्यात घेतले होते.ही चोरी 30 मे 2023 रोजी निदर्शनाला आली होती. श्रीमती गवळी या नातेवाइकांकडून आपल्या फ्लॅट कडे आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात  चोरट्यांने  आतील कपाटामधील 15 हजार रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून सुमारे 1 लाख तीस हजार रुपयाचा  ऐवज लंपास केला होता.ही चोरी आपण केल्याची कबुली अक्षय याने पोलिसात दिली होती. अक्षय याने या गुन्ह्यातील 15 हजार रुपये आपल्या एका मित्राकडे ठेवायला दिले आहेत असे पोलिसाना सांगितले.

त्यानुसार उपनिरीक्षक श्री केसरकर यानी त्यांच्या त्या मित्राकडून सदर रक्कम ताब्यात घेतली.या गुन्ह्यातील चोरलेले दागिने ही पोलिसांना सापडून आले आहेत. बुधवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपी अनंत उर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.