आरोग्य सेवेतील माझ्या यशात सहकाऱ्यांसोबत सावंतवाडीच्या पत्रकारांचाही वाटा !

वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांचं प्रतिपादन | पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं अण्णा केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 03, 2022 17:53 PM
views 174  views

सावंतवाडी : माझ्या आरोग्य सेवेत मी यशस्वी होण्यामागे माझ्या सहकार्‍यांसोबत सावंतवाडीच्या पत्रकारांचाही तितकाच मोठा वाटा आहे, असे मत सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन जेष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रविण मांजरेकर, मसुदा समितीचे अध्यक्ष अभिमन्यू लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग वजराठकर, संदिप सावंत, सागर जाधव, निखाल अवधुते, जिल्हा प्रतिनिधी संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, माजी अध्यक्ष राजेश माेंंडकर, विजय देसाई, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उमेश सावंत, मोहन जाधव, सचिन रेडकर, अमोल टेंबकर,छायाचित्रकार अनिल भिसे, रुपेश पाटील, विनायक गांवस, आनंद धोंड, सिध्देश सावंत, शैलेश मयेकर, जतिन भिसे आदी उपस्थित होते.


यावेळी श्री. दुर्भाटकर म्हणाले, मी सावंतवाडीत यशस्वी डॉक्टर म्हणून ख्याती मिळविली आहे. परंतु मला त्या स्थरावर नेण्यामागे सावंतवाडीतील पत्रकारांचे मोठे योगदान आहे. त्यांनी नेहमी मला सकारात्मक पाठिंबा दिला आणि सहकार्‍यांनी काम करण्याची ताकद दिली. त्याच मुळे या ठिकाणी मी पोहोचू शकलो.यावेळी श्री. केसरकर म्हणाले, पत्रकारांनी आपले आरोग्य जपले पाहिजे. नेहमीच्या कामाच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष होतो आणि नंतर अचानक मोेठे आजार उद्भवतात. त्यामुळे अशा शिबिराच्या माध्यमातून का होईना आरोग्यांची काळजी घेता येवू शकते. यावेळी श्री. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रविण मांजरेकर तर आभार श्री. कुडाळकर यांनी मानले. या शिबिराचा अनेक पत्रकारांनी लाभ घेतला.